सोलापूर : दुचाकीला पाठीमागून दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सोलापूर-अक्कलकोट रोडवरील कुंभारी गावाजवळ घडला.
आसिफ माशाळे असे मयत तरुणाचे नाव असून , सोलापूर जिल्हा परिषदेतील लघुपाटबंधारे विभागाचे कनिष्ठ सहाय्यक कादरसाब माशाळे यांचा तो मुलगा आहे.मयत आसिफ यांची Inttilegence Beuro of India साठी निवड झाली होती. महाराष्ट्रातून दोघांची निवड झाली होती.त्यात आसिफचा समावेश होता.
त्याची 150 पैकी 146 मार्कस घेऊन निवड झाली होती. आसिफ हा two wheeler वर जात असताना ट्रिपल सीटवर वेगाने जाणाऱ्या दुचाकी स्वारांनी पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात असिफचा मृत्यू झाला. कादरसाब माशाळे यांचे ओम गर्जना चौक सैफुल येथे निवास असून दुपारी 4 वाजता अंत्यविधी जुना विजापूर नाका रेल्वे पटरी येथील मुस्लिम कब्रस्तानात होणार आहे.


















