सोलापूर : लष्कर येथे राहणारा ओंकार बलराज धजाल वय वर्षे 19 रा. धजाल बिल्डिंग लष्कर सोलापूर आई वडिलांसोबत सोरेगाव परिसरातील डोणगाव रोड येथील शेतामध्ये फिरायला गेला होता. मात्र शेतातील पत्राशेड वर चढून नारळाच्या झाडावरून नारळ काढण्यासाठी गेला.
नारळ ही त्याने काढली मात्र खाली उतरत असताना झाडा शेजारून गेलेल्या विजेच्या मेन लाइनचा शॉक ओंकारला बसला आणि तो जागेवरच खाली उभारलेल्या आई वडिलांसमोर बेशुद्ध पडला. उपचारासाठी आश्विनीहॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वी मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ओंकार बलराज धजाल हा वालचंद महाविद्यालयात BA-I चे शिक्षण घेत असून आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. भारतातील मलेशिया,मुंबई व विविध राज्यातील स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला आहे.तलवारबाजी मध्ये त्याने सुवर्णपदक मिळवले आहे तसेच राजस्तरीय स्पर्धा मध्ये विजेते पदक मिळवले आहेत.
इंडियन मॉडेल स्कूल येथे प्रशिक्षक म्हणून ही जात असल्याची माहिती मिळाली आहे. अवघ्या 19 वर्षात सुवर्णंपदक मिळविलेल्या ओंकार जाण्याने क्रीडा क्षेत्रात व लष्कर परिसरात शोककळा पसरली आहे.सिव्हिल हॉस्पिटल येथे नातेवाईक व ओंकारच्या मित्रानी ओंकारला पाहण्यासाठी गर्दी केली होती.


















