सोलापुरातील युथ प्राईडचे अध्यक्ष समीर शेख यांचे मोठे बंधू आसिफ शेख यांचे निधन झाले. या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की फॉरेस्ट भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते तथा युथ प्राईड चे अध्यक्ष समीर शेख यांचे मोठे बंधू आसिफ शेख यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. आसिफ शेख हे रायचूर येथे आपल्या सासऱ्याच्या घरी गेले असता तेथे त्यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांचे निधन झाल्याचे समजते. त्यांच्या या निधनाने संपूर्ण फॉरेस्ट भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आसिफ शेख हे काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते धर्मा भोसले यांचे कट्टर समर्थक होते तसेच नगरसेवक विनोद भोसले यांचे अतिशय जवळचे मानले जात होते, सामाजिक कार्यकर्ते जॉन अण्णा फुलारे यांच्या अतिशय जवळचे मित्र होते आसिफ शेख यांच्या पश्चात पत्नी दोन मुले भाऊ बहीण आई वडील असा परिवार असून सध्या रायचूर येथून त्यांची मयत हे सोलापुरात आणल जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांच्यावर मोदी मुस्लिम कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील.


















