सोलापूर : महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती किरण पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते 51 वर्षाचे होते. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी पाच वाजता उत्तर कसबा परिसरातील त्यांच्या राहत्या घरातून निघून त्यांच्यावर पुणे नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
किरण पवार हे 2002 ते 2007 दरम्यान नगरसेवक होते. त्यावेळी त्यांनी स्थायी समितीचे सभापती पद भूषविले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहर युवक अध्यक्ष होते. ते खोखो चे राष्ट्रीय खेळाडू होते. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन वर ही ते पदाधिकारी होते. भारतीय जनता पार्टीचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे ते कट्टर समर्थक मानले जायचे त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच सोलापूर शहरातून शोक व्यक्त होत आहे.