सोलापूर काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते जयंत रच्चा यांचा हैदराबाद मध्ये 4 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला, त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती फेसबुक या सोशल मीडिया वरून समोर आहे त्यांचे वय 33 असून त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील असा परिवार आहे.
जयंत रच्चा हे सोलापूर शहर युवक काँग्रेसचे शहर मध्यचे उपाध्यक्ष व सोशल मीडिया शहर मध्यचे प्रमुख होते अशी माहिती मिळाली. काही महिन्यांपूर्वी जयंत रच्चा हे सोलापूर सोडून हैदराबाद मध्ये नोकरीसाठी गेले होते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व कट्टर समर्थक म्हणून त्यांची सोलापुरात ओळख होती,
यापूर्वी सोलापुरातील जनक्रांती न्यूज चैनल मध्ये त्यांनी मार्केटिंग विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे, हैदराबाद मध्ये त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणावरून केली याची माहिती अद्याप समोर आली नाही मात्र रच्चा यांच्या जाण्याने सोलापूर काँग्रेस सह माध्यमातून मधून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.



















