Tuesday, March 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दोन देशमुखांनी पाडलेले खड्डे राष्ट्रवादी काँग्रेस बुजवतेयं : महेश कोठे यांची टीका ; प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे यांचा पुढाकारातून खड्डे बुजवा अभियान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (प्रतिनिधी) सोलापूर शहरांमध्ये महापालिकेच्या अख्त्यारीत येणारे अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवा अभियान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोलापूर शहराच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा विद्या लोलगे यांनी या अभियानातून पुढाकार घेतला असून शहरात या अभियानाचे उद्घाटन शनिवारी दुपारी नवीन आरटीओ कार्यालय परिसरातील मुख्य रस्त्यावर  झाले. उद्घाटन प्रसंगी महापौर महेश कोठे, शहराध्यक्ष भारत जाधव, शहर कार्याध्यक्ष संतोष पवार,  माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, महिला अध्यक्ष तथा नगरसेविका सुनीता रोटे, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सुहास कदम, माजी नगरसेविका सुनंदा साळुंखे, युवकचे प्रशांत बाबर, प्रांतिक सदस्य महेश निकम्बे,महिला आघाडीच्या मनीषा नलावडे, उपाध्यक्ष राम साठे, सेवादल अध्यक्ष चंद्रकांत पवार, विजय बाहेती, कय्युम शेख, बंडू शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महेश कोठे म्हणाले, भारतीय जनता पार्टीने साडेचार वर्ष सोलापूर महापालिकेत एक हाती सत्ता भोगली मात्र शहराचा विकास किती झाला  त्यांनी दाखवून द्यावे,त्यांचे नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर झाल्याने भ्रष्टाचार वाढला आहे. शहरात पाहिलं तर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत दोन देशमुख मंत्री असतानाही शहराची अवस्था विकासाऐवजी भकास झाली अशा या नाकर्ते भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत घरी बसवा त्यासाठी वेळप्रसंगी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन निवडणुका लढवू.

शहराध्यक्ष जाधव म्हणाले, शहरात मूलभूत सुविधा होत नाहीत, रस्त्यावरील खड्ड्यामुळे बरेच अपघात झाले आहेत, नागरिक त्रस्त आहेत, म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने खड्डे बुजवायचं काम हाती घेतले आहे. मोठे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेला भाग पाडू.

विद्या लोलगे म्हणाल्या, शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे,खड्ड्यामध्ये पडल्याने अपघात वाढले, दुर्घटना वाढल्या, मणक्याचे आजार वाढले आहेत, मात्र महापालिका या समस्येकडे दुर्लक्ष करते आहे, त्याचा विचार करून आम्ही खड्डे बुजवा अभियान हाती घेतले आहे, प्रत्येक प्रभागात हे अभियान राबवणार असून नागरिकांनी आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे आवाहन लोलगे यांनी केले.

सुनीता रोटे म्हणाल्या, महापालिकेत भाजपची सत्ता आहे, मात्र शहराची अवस्था पहिली तर बिकट आहे, सोलापूर नव्हे खड्डेपूर अशी चर्चा असून त्याला महापालिकेतील भाजप सत्ताधारी कारणीभूत आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

निती आयोगाच्या FRP च्या तुकडीकरणाचा निर्णय राज्यात लागू करू नये ; स्वाभिमानीची पालकमंत्र्यांकडे मागणी

Next Post

भाजप खासदारांचे “शिष्य” काँग्रेसच्या संपर्कात ; गाठीभेटी वाढल्या, लवकरच प्रवेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

भाजप खासदारांचे "शिष्य" काँग्रेसच्या संपर्कात ; गाठीभेटी वाढल्या, लवकरच प्रवेश

ताज्या बातम्या

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971194
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group