मंगळवेढा (नारायण माने)- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा रिक्त झालेल्या जागेवर भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांना निवडून आणण्यासाठी निवडणूक यंत्रणा यशस्वीरित्या राबविली. भाजपचे संख्याबळ वाढवण्यासाठी निवडणुकीची यशस्वी धुरा सांभाळली. त्याबद्दल दामाजी कारखान्याचे संचालक भारत निकम यांचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पेढा भरवून अभिनंदन केले.
यावेळी विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक, नूतन आमदार समाधान आवताडे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, मोरे साहेब इत्यादी उपस्थित होते. मुंबई येथील फडणीस यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.
या निवडणुकीत निकम यांची स्वतंत्र प्रचार यंत्रणा होती, मंगळवेढा, पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावात ही यंत्रणा काम करत होती, प्रचाराचे नियोजन, विविध नेत्यांच्या सभा, कार्यकर्त्यांसाठी भोजन व्यवस्था, स्टेज, माईक सिस्टीम, अशी बरीच मोठी जबाबदारी निकम यांच्यासह आवताडे यांच्या सहकाऱ्यांनी सांभाळली होती.


















