राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यात सांगोला चे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट आणि त्यानंतर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या निवासस्थानी भेट असा त्यांचा दौरा कार्यक्रम होता. दुपारी दीड वाजता ते पुण्याहून सांगोल्याला आले, त्याठिकाणी सांत्वन करून ते पंढरपूर मार्गे बार्शीला जात होते, वाटेत शेटफळ येथे सोलापूर भाजप नेते व जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी सत्काराचे नियोजन केले होते,
हलग्यांच्या निनादात कार्यकर्त्यांसह डोंगरे थांबून होते चार वाजून दहा मिनिटांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याचे आगमन झाले, फटाक्यांची आतिषबाजीत फडणवीस साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ची घोषणाबाजी झाली त्यानंतर विजयराज डोंगरे यांनी मोठा हार घालून फडणवीस यांचे जंगी स्वागत केले, यावेळी फडणवीसांच्या गाडीत बसलेले खासदार रणजित नाईक निंबाळकर हे खाली उतरून हारामध्ये आले. डोंगरे यांचा सत्कार स्वीकारून फडणवीस हे बार्शी कडे रवाना झाले.
यावेळी संजय क्षीरसागर, डॉ अमित व्यवहारे, सुशीलकुमार क्षीरसागर, बाळासाहेब पवार, सुनील पाटील , सरपंच लक्ष्मी वागज, उपसरपंच दत्तात्रय वागज, विशाल पवार , दीपक गवळी, दीपक पुजारी, नितीन सोनटक्के, जयराम गुंड, बालाजी खुर्द, दिलीप गायकवाड, राजेश धावणे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागताचा हा व्हिडीओ पहा



















