उमेरा फय्याज सगरी वय 13 राहणार रविवार पेठ असे अपघातात मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे. उमेरा ही शुक्रवारी सकाळी राहते घर ते मुस्लीम पाच्छा पेठ कडे सायकल वरून क्लासला जात होती ती जोडबसवणा चौक येथील स्वामी विवेकानंद हॉस्पिटल समोर आली असता पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक MH04 CG 5363 या वाहनाने जोराची धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाल्याने तिला बेशुद्ध अवस्थेत जुबेर सगरी यांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल केले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकी येथे झाली आहे.
दरम्यान नातेवाईकांनी जेलरोड पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. जो पर्यंत ट्रक ड्राइवरला अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.


















