दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी गावात अशोक चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून मायलेकींनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.राचम्मा संतोष पटणे (वय २६ ) व मुलगी चैत्रा पटणे (वय ६) वर्ष दोघे राहणार पाटणे गल्ली,होटगी,तालुका दक्षिण सोलापूर यांचे मृतदेह बुधवारी विहिरीतील पाण्यावर तरंगताना
आढळून आले.लोकांच्या मदतीने त्या मायलेकींना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढून रुग्ण वाहिकेतून उपचारासाठी सोलापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याची माहिती डॉक्तरांनी दिली आहे.
या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. तसेच वळसांग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे .या घटनेने होटगी गावात खळबळ उडाली असून मायलेकींनी असे एकत्र जीव दिल्याने सर्वत्र हळहळ सुध्दा व्यक्त होत आहे.


















