सोलापूर : शहराचे माजी महापौर सुभाष पाटणकर यांचे शनिवार १४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ७२ वर्षाचे होते. १९९५-९६ कालावधीत त्यांनी सोलापूर चे महापौर पद भूषविले होते.
मरणोत्तर त्यांचे नेत्रदान व अश्विनी महाविद्यालय, कुंभारी येथे देहदान करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. ते शरदचंद्र पवार यांचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, १ विवाहित मुलगा, १ मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.