सोलापूर : मोहोळ तालुक्यातील तांबोळे येथे वीज अंगावर पडल्याने बाळू गोविंद सरवदे आणि त्यांचा भाऊ प्रकाश गोविंद सरवदे हे तांबोळे हद्दीतील शेतावर काम करत होते.त्यावेळी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.त्यावेळी बाळू सरवदे यांच्यावर वीज कोसळल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर बंधू प्रकाश जखमी झाले आहेत.
याचदरम्यान पोखरापुरात मारुती कडाप्पा लेंगरे हे दरवाजात उभे असताना वीज त्यांच्यासमोर दरवाज्यात कोसळल्यावर धक्का बसल्याने ते बाजूला पडले त्यावेळी दरवाजाचा लोखंडी खीळा डोक्यात घुसल्याने एक जण गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे,
तर तिसऱ्या घटनेत कोन्हेरी येथील शेतकरी जनार्धन महिपती मुळे यांच्या जनावरांच्या गोठ्यावर वीज पडली. त्यात त्यांची दुभती म्हैस मृत्युमुखी पडली.सध्या सोलापूर जिल्ह्यात परतीचा मान्सून दाखल झाला असून तो मेघगर्जनेसह बरसत आहे. शिवाय विजांच्या कडकडाटात वीज कोसळण्याचे प्रमाणही विलक्षण वाढले आहे. त्यामुळं शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.


















