वळसंग : वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथील ज्येष्ठ नागरिक व माजी जिल्हा परिषद सदस्य शिवलिंगप्पा करबसप्पा कोडले ( वय ८२ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या करारी स्वभावाने ते परिचीत होते मार्केट कमीटीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी ,तीन मुले,सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या दुपारी एक वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.
वळसंगचे सलग २१वर्षे सरपंच होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्षपदी सलग पंधरा वर्षे त्यांच्याकडेच होते. माजीमंत्री आनंदराव देवकते यांचा उजवा हात म्हणून ते ओळखले जात असत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कट्टर समर्थक आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते म्हणून त्यांची ओळख होती.

















