सोलापूर परिवहन समितीचे माजी सदस्य, एम.के.फाउंडेशनचे संचालक, पूर्व भागातील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते, भैरण्णा भैरामडी यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ६३ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
शनिवार दि १७ जून रोजी दुपारी १० वाजता नीलम नगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघेल, तुळजापूर वेस येथील लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

















