सोलापूर,दि.25 श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, टिव्ही 9 चे पत्रकार सागर सुरवसे यांचे वडील सुभाष भानुदास सुरवसे यांचे निधन झाले.ते 67 वर्षांचे होते
स्वेरी कॉलेज, पंढरपूर येथे वर्कशॉप विभागाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शिवशाही सोलापूर येथे अनेक वर्ष सेवा बजावली
त्यांच्या पश्चात पत्नी जयश्री, दोन मुले शंकर, सागर तसेच सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी 11 वाजता विस्थापित नगर, भक्ती मार्ग, पंढरपूर येथून निघणार आहे.


















