सोलापुरातील दैनिक तरुण भारतचे ज्येष्ठ संपादक, ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी यांच्या पत्नी स्मिता विवेक घळसासी यांचे बुधवारी नागपूर येथे सकाळच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. घळसासी हे सध्या नागपूर याठिकाणी स्थित झाले आहेत. अनेक वर्षे ते सोलापूरात वास्तव्य केल्याने ते अनेकांना परिचित आहेत.
नागपूर येथील सहकार नगर घाटावर सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
















