सोलापूर : सोलापूर शहरातील डी के मागासवर्गीय बहुउद्देशिय सामजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ कसबे यांच्या पत्नी सारिका कसबे यांचे गुरुवारी आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा भवानी पेठ मुकुंद नगर येथील राहत्या घरापासून आज सायंकाळी सहा वाजता निघून रूपाभवानी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या या निधनाने संपूर्ण शहरातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून विविध स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

















