नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते, माजी दिल्ली विधानसभा अध्यक्ष योगानंद शास्त्री यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा शेला गळ्यात घेतला. प्रवेश केल्यानंतर पवारांनी शास्त्री यांचे स्वागत केले त्यावेळी सोलापूर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील उपस्थित होते.
दरम्यान अनेक राज्यात पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी संघटना मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. दिल्ली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. देशाच्या राजधानीत आमच्या पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो.असे शरद पवारांनी ट्विट केले आहे.

















