सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या मराठवाड्याचा दौऱ्याला गुरुवार पासून सुरुवात झाली, या दौऱ्याला जाण्यापूर्वी ते सोलापुरात पहाटे पाचच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात दाखल झाले सकाळी नऊच्या सुमारास त्यांचा मराठवाडा दौरा सुरू होणार असल्याने शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांनी तसेच अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती,
9 वाजून 20 मिनिटांनी ते विश्रामगृहाच्या बाहेर पडले मात्र दिलीप माने यांच्या 3456 या ब्लॅक गाडीमध्ये ते बसले ड्रायव्हरच्या बाजूला काका साठी तर जयंतराव पाटील यांच्या बाजूला दिलीप माने बसले कुणाला काही समजले नाही मात्र हा सर्व ताफा होटगी रोड वरील दिलीप माने यांच्या “सुमित्रा” निवासस्थानाकडे रवाना झाला,
थोड्याच वेळात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचेही सुमित्रा निवासस्थानी आगमन झाले, त्यानंतर याठिकाणी माने यांच्या घरात सर्व नेत्यांनी नाश्ता व चहा घेतला त्यानंतर दिलीप माने यांनी यांनी सर्वांचा सत्कार केला यावेळी आपले चिरंजीव पृथ्वीराजसह उत्तर तालुक्याचे ज्येष्ठ नेते काका साठे यांना फोटोमध्ये घ्यायला माने मालक विसरले नाहीत,
यावेळी महेश गादेकर,शफी इनामदार, नगरसेवक किसन जाधव, विजय जाधव, दीपक राजगे, मिलिंद गोरे यांची उपस्थिती होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप माने हे इच्छुक आहेत याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी माने यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पाहुनचारानंतर जवळजवळ महा विकास आघाडीकडून दिलीप माने हे निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत.


















