सोलापूर : दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने यांनी आडरानात अपघात होऊन जखमी झालेल्या युवकाला सोबत असलेल्या कारमध्ये घालून पुढे ॲम्बुलन्सने पुढील उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलकडे पाठवून दिले.
शुक्रवारी माजी आमदार दिलीप माने हे आपल्या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कुसुर भागात गणपती पूजेसाठी जात होते, शंकरनगर व कूसुर गाव करून ते परतत असताना वाटेत दोन दुचाकी वाहनांचा अपघात झाला त्यात एक युवक गंभीर जखमी होऊन पडला होता.
आडरान असल्याने मदतीला कुणी येत नव्हते हे पाहून दिलीप माने यांचा ताफा थांबला, त्यांनी लगेच आपल्या सोबत असलेल्या माजी उपसभापती चंद्रकांत खुपसंगे यांच्या गाडीत उचलून घातले. तिथून पुढे निंबर्गी गावात येऊन ॲम्बुलन्स मध्ये घालून पुढील उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलकडे पाठवून दिले.
यावेळी समवेत गंगाधर बिराजदार, अप्पासाहेब काळे, अप्पाराव कोरे, चंद्रकांत कुबसंगे, निंबर्गीचे उपसरपंच पिरसाब हवालदार आदिनी मदतीची भूमिका बजावली.