सोलापूर : एम आय एम नेते, शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी रविवारी बेरिया फंक्शन हॉल या ठिकाणी रोजा विस्तार पार्टीचे आयोजन केले होते. फारूक शाब्दि हे मागील चार दिवसापासून सोलापुरात ठान मांडून होते. त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन या रोजा इफ्तार पार्टीला निमंत्रण दिले होते.
त्यानुसार या रोजा इफ्तार पार्टीला प्रचंड अशी गर्दी दिसून आली. स्वतः फारुक शाब्दी आणि त्यांचे वडील मकबूल शाब्दी दोघांनी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य केले. माजी नगरसेवक गाझी जहागीरदार, अझहर हुंडेकरी कोमारो सय्यद, सलीम पामा, कमरुल शेख, अशपाक शेख, मोहसीन मैंदर्गीकर हे कार्यकर्ते मदतीला होते. रोजा इफ्तार पार्टीचे हायटेक नियोजन दिसून आले.
माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर महेश कोठे या दोन नेत्यांनी रोजा इफ्तार पार्टीला आवर्जून उपस्थिती लावली. हैदराबाद वरून एमआयएम पक्षाचे सोलापूर निरीक्षक अन्वर सादात हे सुद्धा आले होते. शाब्दी यांनी महेश कोठे दिलीप माने यांना खजूर भरवून त्यांचा सन्मान वाढवला.
जॉन फुलारे, श्रीदेवी फुलारे या दांपत्यानी आपले चिरंजीव विराज फुलारे सोबत उपस्थिती लावली. यावेळी गोल्डन नगरसेविका फुलारे यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले. फारुख भाईंच्या इफ्तारला आनंद चंदनशिवे आवर्जून उपस्थित होते. दादांनी भाईला खजूर भरवून फोटो काढला.
काँग्रेसचे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, तौफिक हत्तूरे, माजी सभागृह नेते मकबूल मोहोळकर, शकील मौलवी, जुबेर कुरेशी, शोएब मागामी, शौकत पठाण, रियाज मोमीन, यु एन बेरिया, मन्सूर गांधी, मतीन बागवान, नाना काळे, अजाय दिना यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे यांनीही उपस्थिती लावून कार्यक्रमाची शान वाढवली.




















