सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांनी यांची अष्टविनायक यात्रा बुधवारी सुरू झाली. माने हे आपल्या पत्नीसह उत्तर सोलापूर तालुक्यातील तब्बल 700 महिलांना घेऊन अष्टविनायक दर्शनासाठी रवाना झाले आहेत. ‘गणपती बाप्पा मोरया’चा यावेळी जयघोष झाला.
बुधवारी सकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये तब्बल 15 चडचणकर ट्रॅव्हल्स थांबून होत्या, प्रत्येक ट्रॅव्हलमध्ये 50 महिला बसल्या होत्या. दिलीप माने व त्यांच्या पत्नी जयश्री माने यांच्या हस्ते श्रीगणेशाची पूजा करून या यात्रेला सुरुवात झाली. या सर्व महिला उत्तर सोलापूर तालुक्यातील असून 4 दिवसाचा प्रवास असून 3 दिवसांचा मुक्काम आहे.
माध्यमांशी बोलताना दिलीप माने म्हणाले, सोलापूरात सुख समृद्धी राहो, सोलापूरवर कोणतेही संकट येऊ नये अशी प्रार्थना अष्टविनायकांच्या चरणी आम्ही करणार आहोत, सोबत महिला डॉक्टर, नर्मदा हॉस्पिटलच्या महिला कर्मचारी आहेत, सर्वांची राहण्याची, जेवणाची सोय आम्ही स्वतः करीत आहोत, सुरुवातीला 10 गाड्याचे नियोजन होते मात्र महिलांचा प्रतिसाद पाहून 15 ट्रॅव्हल्स कराव्या लागल्या, दोन महिन्यापासून हे नियोजन सुरू होते.




















