सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली यावेळी त्यांना निवेदन दिले. निवेदन देते वेळी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे नूतन संचालक शिवानंद पाटील चंद्रकांत खूपसंगे गंगाधर बिराजदार आप्पासाहेब काळे श्रीशैल पाटील बाळासाहेब पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यात 1 ते 3 डिसेंबर दरम्यान अवकाळी पाऊस झाला, जिल्ह्यात सुमारे 29 मिलिमीटर झालेल्या पावसामुळे खराब वातावरण तयार झाले, त्याचा फटका द्राक्ष बागायतदार, कांदा व इतर पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. सोलापूरच्या शेजारील सांगली आणि अहमदनगर जिल्ह्यात मात्र प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू केले आहेत, सोलापूर जिल्ह्यात सुमारे 40 ते 50 टक्के द्राक्ष पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे विशेष करून नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे पंचनामे व्हावेत अशी मागणी दिलीप माने यांनी यावेळी केली…
















