विजयदशमी सणाच्या शुभमुहूर्तावर मोटारसायकल खरेदी करण्यासाठी बँकेतून काढलेले एक लाख पंचवीस हजार रुपये मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात इसमांनी हिसकावून पळविल्याची घटना बाळीवेस परिसरात घडली.
गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास ही घटना बाळीवेस परिसरातील मल्लिकार्जुन मंदिरासमोर घडली. श्रीकांत रामचंद्र तावस्कर वय 49 राहणार अभिमानश्री नगर यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व त्यांचा मुलगा आनंद हे दोघे दसरा सणा निमित्त दुचाकी वाहन खरेदी करण्यासाठी बाळीवेस भागातील बँकेतून एक लाख पंचवीस हजार रुपये काढून ते पिशवीमध्ये ठेवून बाहेर आले असता पाठीमागून दोन अज्ञात इसम एम एच 13 बी के 5718 या मोटर सायकल वरून आले आणि त्यांनी फिर्यादीच्या हातातील पिशवी हिसकावून तिथून पसार झाले याचा तपास फौजदार देशमाने हे करत आहेत.

















