दक्षिण तालुक्याचे नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त निंबर्गी येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला. रक्तदान शिबिराचे उदघाटन स्वामी समर्थ सूत गिरणीचे संचालक शंकरराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
निंबर्गी ग्रामपंचायतच्यावतीने गावात विविध विकास कामाचे उदघाटनही करण्यात आले. गावातील मस्जिद समोर सिमेंट कॉक्रीट करण्याच्या कामाचे भूमिपूजन गंगाधर बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आला. प्राथमिक शाळेत पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे उदघाट्न मल्लिनाथ जमगोंडे यांच्या हस्ते तसेच अंगणवाडी क्र 3 समोर वालकंपाउंडचे भूमिपूजन माजी उपसरपंच अरुणकुमार बिराजदार यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी सरपंच श्रीदीप हसापुरे, ज्येष्ठ नेते जगदेव ककमारे, उपसरपंच पिरसाब हवालदार, चेअरमन बाळासाहेब उदाने, अप्पासाहेब माने, महादेव फुलारी, प्रदीप खूने, जगू स्वड्डी, येदा दुपारगुडे, सिद्धाराम वाघ, कल्यानी शिरगोंडे, निशांत लाडे, गैबिसाब इनामदार, परशुराम नायकोडे, ग्रामसेवक दयानंद पाटील आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.




















