सोलापूर : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते दोन्ही प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज, कृषी अधिकारी महेश नारायणकर, कनिष्ठ प्रशासनाधिकारी आप्पासाहेब गायकवाड, तजमुल मुत्वली, त्याचबरोबर विस्तार अधिकारी राजशेखर कमळे, अमर दोडमनी, बाबासाहेब पाटील कृषी अधिकारी अश्विनी ओहोळ पुनम नरसोडे व पंचायत समिती अंतर्गत सर्व खाते प्रमुख, अधिकारी ,कर्मचारी उपस्थित राहून अभिवादन करण्यात आले. अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिता लामतुरे ,कैलास जिंदे, बाळासाहेब ममाने ,अविनाश गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.


















