सोलापूर-दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथे महाराष्ट्र राज्य परिवहनच्या एसटी चालकास मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, मारहाण होऊन ही त्या एसटी चालकाने घाबरून गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती मिळाली.
याबाबत फोनवरून त्या एसटी चालकाशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की,
एसटी चालक लक्ष्मण बल्लारी आणि वाहक जमादार हे सोलापूर ते तेलगाव ता मार्गावर गुरुवारी 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी एसटी घेऊन गेले होते.पंधरा मिनिटं थांबून पुन्हा सोलापूर कडे येत असताना गावातच 15 ते 20 फुटांच्या अंतरावर येताच हंनुरसिद्ध कोळी याने मागून एसटीला मोठा दगड मारला. त्यानंतर एसटीचालक लक्ष्मण बल्लारी यांना एसटी मधून बाहेर ओढत काढले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
ग्रामस्थांची बघ्याची भूमिका आणि सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल-
तेलगाव येथे गुरुवारी सायंकाळी ही मारहाण होत असताना गावातील ग्रामस्थांनी बघ्याची भूमिका घेतली.मात्र एका नागरिकाने व्हिडीओमध्ये सर्व मारहाण आणि धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ रिकॉर्डिंग केलं आहे.हा व्हिडीओ शुक्रवारी सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला.एसटी चालक दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर या गावचा रहिवाशी असून शुक्रवारी त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

















