मोहोळ रेल्वे स्टेशनजवळील स्लीफर फॅक्टरीतील दीड दिवसाच्या गणेशोत्सवातील श्रीगणेश मुर्तीचे आष्टे बंधाऱ्यावरील सिना नदीच्या पात्रामध्ये शनिवारी विसर्जन करताना पाण्यामध्ये बुडालेला या युवकाचा मृतदेह कोळेगांव येथील स्थानिक मच्छीमाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने शोधुन काढण्यास चाळीस तासानंतर अखेर पोलीसांनी सोमवारी यश आले आहे.
सौरभ सुभाष बेंबळगे राहणार लातूर असे त्या मृत युवकाचे नाव आहे, मोहोळ स्टेशनजवळ रेल्वे रूळाखालील सिमेंटचे स्लीफर तयार करणाऱ्या कारखान्यातील गणेशाच्या मुर्तिचे विर्सजन करण्यासाठी शनिवारी कंपनीचे काही कामगार एका चारचाकी वाहनामध्ये सिना नदीवरील आष्टे बंधाऱ्यावर गेले होते. उपस्थित कामगारापैकी सौरभ सुभाष बेंबलगे हा युवक मोठ्या उत्साहाने श्री मुर्ती घेऊन नदीच्या खोल पात्रात उतरला. परिणामी पाण्याच्या वेगाचा व खोलीचा अंदाज न आल्याने क्षणातच सौरभ बेंबलघे हा पाहता पाहता नदीच्या पात्रात बुडाल्याने बेपत्ता झाला होता. याबाबतची खबर स्लीपर कंपनीतीलच प्रकाश पाटील यांनी पोलीसांना दिली होती.



















