सोलापूर : एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन जोरदार भाषण केले राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता महापालिकेत आणण्याचा निर्धार केला. यावेळी त्यांनी अधिकृत प्रवेश केला नाही या पार्श्वभूमीवर एमआयएमचे शहराध्यक्ष फारूक शाब्दि हे रविवारी सोलापुरात आहेत एका विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी पत्रकारांनी त्यांना तौफिक शेख यांच्यावर पक्ष कारवाई करणार का?
त्यावर प्रतिक्रिया देताना फारूक शाब्दि यांनी तौफिक पैलवान यांचा अहवाल एमआयएम राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अससुद्दीन ओवेसी यांच्यापर्यंत गेला आहे, शुक्रवारी झालेल्या सर्व घडामोडी कळविण्यात आल्या आहेत त्यामुळे येत्या काही दिवसात पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष सोलापुरात येणार असून त्यानंतर निर्णय घेतला जाईल मात्र तौफिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला नाही यावरून लगेच निर्णय घेता येणार नाही असेही शाब्दी यांनी सांगितले.


















