सोलापूर ! काँग्रेसच्या आमदार तथा प्रदेशच्या कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी काँग्रेस भवनमध्ये शहराध्यक्ष प्रकाश वाले, शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, नगरसेवक विनोद भोसले, यांच्यासह शहरातील काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष यांचे महत्त्वाची बैठक घेतली सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी महापालिकेची रणनीती विचारली असता अजून निवडणुकीला सहा महिने अवकाश आहे मात्र आमचा विरोधक हा भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असतील असे सांगताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्व देणे टाळले तसेच काँग्रेस एमआयएम सोबत जाणार का? या त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्ष पद स्वीकारणार का? यावर मात्र त्यांनी सावध उत्तर दिले.पहा त्या काय म्हणाल्या


















