उत्तर सोलापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व तळे हिप्परगा गावचे माजी सरपंच लोकनेते अंकुश नाना कांबळे यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त तळे हिप्परगा जिल्हा परिषद शाळा येथे अंगनवाडीतील लहान मुलांना 100 गणवेश व शालेय शिक्षण साहित्याचे वाटप उत्तर सोलापूरचे बाल विकास प्रकल्प अधिकारी समाधान नागने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सरपंच वैशाली धुमाळ, बसू सुरवसे, बाळकृष्ण जाधव, डिगबर कांबळे, राहुल मस्के, बाळासाहेब सुरवसे, लिंगप्पा धुमाळ, गणेश कोरे, शेरा पटेल, गुरलीग धुमाळ, दत्ता जाधव, जिल्हा परिषदचे पाटील, अंगणवांडी सेविका मनीषा होटकर, शिला बोडवे, देवकते, ताटे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन ग्राम पंचायत सदस्य विशाल अंकुश कांबळे यांनी केले होते.
यावेळी अंकुश कांबळे यांनी केलेल्या समाज उपयोगी कार्याचा गौरव करण्यात आला व त्यांना अभिवादन करण्यात आले.


















