Saturday, March 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

तर पालकमंत्री विखे-पाटलांनी सिध्देश्वरच्या 28 हजार शेतकरी आणि 15 हजार कामगारांच्या थडग्यासाठी जागा शोधावी !!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 January 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter




दत्ता थोरे । 9922930208

सोलापूरचे ग्राममदैवत शिवयोगी श्री. सिध्देश्वर यांच्या यात्रेनिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे सोलापूर दौर्‍यावर आले आहेत. त्यांच्या दौर्‍याचा पहिला दिवस हा शिवयोगी सिध्देश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंग़ावरील तैलाभिषेकाचा दिवस होता. सोलापूरचे भाविक भक्तीभावात रममाण होते. हा तैलाभिषेक करताना भाविकांनी ओतलेले शिवलिंगावरील तेल ओघळायच्या आधीच विखे-पाटील यांनी, ज्या ग्रामदैवताच्या यात्रा उत्सवासाठी ते आले आहेत, त्यांच्याच नावाने सुरू असलेल्या सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून विमानसेवा सुरू करण्याबाबत प्रशासन गतीमान असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 


ही बातमी पसरताच चिमणी पाडण्यासाठी आसुसलेल्या छोटा चेतन आणि त्यांच्या काऊंटर गँगने त्यांना गाठून लागलीच सत्कारही केला. जणू काय आता चिमणी पडलीच या अविर्भावात ही गँग असावी. पण आमचे या गँगला आणि खुद्द पालकमंत्री विखे-पाटील यांना नम्र विनंती आहे की चिमणीचा वाद विनाकारण वाढणार नाही याची खबरदारी त्यांनी घ्यायला हवी. कारखाना काही धर्मराज काडादींच्या मालकीचा नाही. ते विश्वस्त असून कारखाना 28 हजार शेतकरी सभासदांच्या मालकीचा आहे. काडादी फक्त विश्वस्त आहेत. चिमणी पाडून सिध्देश्वर कारखाना बंद करण्याचे सोलापुरातील एका चांडाळ चौकडीचे षडयंत्र ओळखून पालकमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावे. चिमणी ठेवून विमानसेवा सुरू करावी, आणि बोरामणी विमानतळासाठी आवश्यक असलेली जमीन वनविभागाकडून काढून तत्काळ विमानतळ प्रशासनाकडे सुपूर्द करीत बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लावावा. त्यांचे असे वागणेच पालकमंत्री या पालकत्वाच्या भूमिकेला साजेसे आहे. 


जर पालकमंत्री चिमणी पाडूनच व पर्यायाने सिध्देश्वर कारखाना बंद करूनच होटगी रोड विमानतळावरून जर विमानसेवा सुरू करणार असतील तर त्यांनी आधी 28 हजार शेतकरी सभाषद आणि दहा हजार कामगारांच्या थडग्यासाठी जागा शोधून ठेवावी. या कारखान्याचे मूळ मालक असलेले सभासद शेतकरी आणि कामगार रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत चिमणीला लष्कर जरी आले तरी धक्का लागू देणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.


पालकमंत्री विखे – पाटील यांना आमचे आणखी एक सांगणे आहे की राज्यकर्त्यांने कायम आईसारखे असले पाहीजे. आईला चार बाळे असतील तर आई तिचे जे सर्वात दुबळे बाळ आहे, त्याचे जास्त लाड करते. ज्या विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना काढून महाराष्ट्राला सहकाराचा कानमंत्र दिला, त्यांचाच वारस साठ वर्षे चाललेला जिल्ह्यातील सिध्देश्वरसारखा ‘सहकारी कारखाना’ उध्दवस्त करण्याची भाषा करतो, मुळात हेच अचंबित करणारे आहे. त्यांचे हे विधान ऐकून स्व. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्यासुध्दा काळजाचा ठोका चुकला असेल. पालकमंत्र्यांना कोण प्रिय आहे? काडादींचा केसही वाकडा करता येत नाही, म्हणून त्यांना खिंडीत गाठण्याच्या नादात चिमणी आडून शेतकर्‍यांची व कामगारांची रोजी रोटी हिरावून घेणारी सोलापुरातील चार टाळकी की अठ्ठावीस हजार सभासद शेतकरी? आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर पाकलमंत्र्यांच्या समोर शेतकर्‍यांच्या ऊसाच्या कांडीचे भविष्य उध्दवस्त करू पाहणार्‍या सोलापूर विकास मंचच्या चांडाळ चौकडीला तत्काळ कैद करून मुसक्या बांधायचे आदेश दिले असते. पण त्यांचा वारसा सांगणार्‍या आणि अभिमानाने मिरवणार्‍या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सारख्या एका अत्यंत जबाबदार राज्यकर्त्याने ‘एका माणसाच्या हट्टापायी‘ हे असे शब्द उच्चारणे शोभत नाही. 


कारखाना बंद पडला तर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या धर्मराज काडादी यांचे काडीचेही नुकसान होणार नाही. ते काही उपाशी मरणार नाहीत.  नुकसान होणार आहे ते शेतकरी सभासदांचे. कामगारांचे. त्यांची रोजी रोटी हिरावली जाणार आहे. सिध्देश्वर हा सहकारी साखर कारखाना आहे आणि त्याची मालकी सभासद शेतकर्‍यांची आहे, याचे भान सहकार आणि साखर कारखानदारीत मुरलेल्या नेत्याला राहू नये, याचे आश्चर्य वाटते. ते खरोखरच सोलापूरचे पालकमंत्री असतील तर अवघ्या दोन महिन्यात बोरामणी विमानतळासाठी अडलेली जमीन हस्तांतरीत करून सोलापूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ देऊ शकतात. दोन महिन्यात तिथे धावपट्टी बनवून चार महिन्यात विमानसेवा सुरू करू शकतात. पण तसे न करता त्यांनी चिमणी आडच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करून सिध्देश्वर साखर कारखान्याचा नरडीचा घोटच घ्यायचे ठरविले असेल तर आम्ही तरी काय करणार? पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की लोकशाही मार्गाने त्यांनी चिमणी पाडण्याचे स्वप्न विसरून जावे. चिमणी पाडून कारखाना उध्दवस्त करू पाहणार्‍या त्यांच्या आणि चिमणीच्यामध्ये जे अठ्ठावीस हजार शेतकरी आणि पंधरा हजार कामगारांनी एकजुटीची जी भिंत उभी केली आहे. ती त्यांना चिरडावी लागेल. 


पोलिस बोलवा, लष्कर बोलवा आणि त्यांना खल्लास करून त्यांची आधी थडगी बांधा. मग तुमच्या मार्गातील सगळे अडथळे दूर होऊन मगच तुम्हाला चिमणी पाडून विमानसेवेचा जिर्णोध्दार करता येईल, एवढे लक्षात ठेवावे. सोलपुरचा इतिहास लधवय्या आहे. इथल्या कामगारानी  देशात सर्वात आधी इंग्रजांचा झेंडा खाली उतरवला आणि तीन दिवसांचे स्वातंत्र भोगले. त्याची किम्मत मोजतना चार हुतात्में हसत फ़ासावर गेले. बलिदान आमच्या रक्तात आहे, ते आम्हाला नविन नाही. परिक्षा तुम्ही इंग्रज होता का ? त्याची असेल.

(सदस्य, बोरामणी विमानतळ व सिध्देश्वर कारखाना बचाव कृती समिती.)

SendShareTweetSend
Previous Post

पालकमंत्र्यांचे विमानसेवेचे राजकारण समजेना ; दुटप्पी भूमिकेने चर्चेला तोंड फुटले ; गाळप झाल्यावर चिमणी पाडण्याची भाषा

Next Post

सोलापूरच्या पालकमंत्र्यांसाठी सिद्धेश्वर देवस्थानची पहिल्यांदाच ‘व्हीव्हीआयपी’ सोय ; पोलिसांचा पत्रकारांसोबत दुजाभाव

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरच्या पालकमंत्र्यांसाठी सिद्धेश्वर देवस्थानची पहिल्यांदाच 'व्हीव्हीआयपी' सोय ; पोलिसांचा पत्रकारांसोबत दुजाभाव

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971567
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group