सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना जाणीवपूर्वक त्यांच्या सुरक्षितेत केले गेलेला निष्काळजीपणा व त्यांच्या हत्येचा कट रचला गेला होता का? या संदर्भात चौकशी करण्यात यावी ही मागणी भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहराच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस उपायुक्त यांना भेटून निवेदन देऊन करण्यात आली.
पंतप्रधान मोदी जेंव्हा सभा रद्द करून परत फिरले आणि भटींडा विमानतळावर पोहोचल्यावर विमानतळावरील अधिकाऱ्याला म्हणाले की, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद कळवा की, मी जिवंत विमानतळावर पोहोचलो. मोदींच्या या वक्तव्यावरून काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये मोदींच्या हत्येचा कट रचला गेला होता, यावर चर्चा सुरू झाली असून मोदींसारखे देशातील लोकप्रिय नेत्याच्या बाबतीत अशी घटना घडल्याने देशातील कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते व याला सर्वोपरी पंजाब मधील काँग्रेस सरकार जबाबदार असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील हल्ल्याचा नेमका सूत्रधार कोण? त्यांच्या या पूर्ण कटात त्यांना कुणाची साथ होती? असा देखील प्रश्न उपस्थित असून या घटनेची सखोल चौकशी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाही करण्यात यावे अन्यथा काँग्रेस नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असे भारतीय जनता युवा मोर्चेचा वतीने इशारा देण्यात आला..
या प्रसंगी युवामोर्चेचे सागर अतनुरे,अक्षय अंजिखाने,यातीराज व्होनमाने,शिलवंत छपेकर,अशोक कोडम,महेश जेऊर,विशाल बनसोडे,बसवराज चडचन,रोहित परीट आदी उपस्थित होते*..

















