सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी मंच,सोलापूर व सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.अलदर व ॲड. अजय रणशृंगारे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. सदर रक्तदान शिबिरात 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमास ॲड.अमोल कोळी ॲड.करण भोसले ॲड. व्हनमारे ॲड. प्रशांत उबाळे ॲड. विनोद कांबळे ॲड. सत्यजित वाघमारे ॲड.कलशेट्टी ॲड.संतोष बनसोडे ॲड. आकाश बंगाळे ॲड. विक्रम वाघमारे ॲड.बंटी घाडगे ॲड.शताब्दी कुमार दोड्यानूर ॲड. सुधाकर राजगुरू ॲड.सूरज पाटोळे ॲड. मलिक कांबळे ॲड. कटकुर ॲड.शांतवीर महिंद्रकर ॲड.निलेश ठोकडे ॲड.दीपक हुलसुरे बार चे माजी अध्यक्ष ॲड.अंकलगी ॲड.विशाल मस्के, अभिजीत भडकुंबे आदी उपस्थित होते


















