सोलापूर :- सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राशीद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार शब्बीर मणियार, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अकबर शेख, फिरोझ पटेल, हुसेन शेख, मशाक मुजावर यांसह अनेक कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात राशिद शेख म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर मनुवादी जातिव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केला. सामाजिक समतेची चळवळ खऱ्या अर्थाने प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे बाबासाहेब आंबेडकर पुन्हा या जगात होणे नाही.
गरीब शेतकरी कष्टकरी कामगाराचा मुलगा किंवा मुलगी शिक्षणाच्या जोरावर आयुष्यात यशस्वी झाल्यास खऱ्या अर्थाने बाबासाहेबाना अभिवादन ठरेल असेही प्रतिपादन राशिद शेख यांनी केले आहे.

















