सोलापूर : भारताचे माजी राष्ट्रपती ज्येष्ठ शास्त्रज्ञ मिसाईल मॅन म्हणून ज्यांची जगात ख्याती आहे असे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे कार्य अल्पसंख्यांकासह समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राशिद शेख यांनी केले.
डॉ. ए.पी.जे. अब्दुलकलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा कांग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राशिद शेख बोलत होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन देशाच्या सर्वोच्च स्थान असलेल्या राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारलेले डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जपणे व त्यांचे विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवणे अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःसह समाजाचा विकास साधल्यास हीच त्यांना खरे अभिवादन ठरेल.
यावेळी कांग्रेसचे शहर अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष रियाज नाईकवाडी, जिल्हा सरचिटणीस अकबर शेख, मुस्ताक लालकोट, लतीफ शेख, फुरकान मुल्ला, यासीन शेख, फैजान पठाण, समीर पठाण, शादुल्ला बागवान, सादीक बक्षी, अल्ताफ बक्षी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
















