सोशल मीडियाच्या जमान्यात कधी काय होईल, काय व्हायरल होईल हे सांगणे कठीण आहे, सध्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर पुण्यात तीन वर्षांपूर्वी घडलेली एक दुर्घटनेची बातमी सर्वत्र फोटोसह व्हायरल झाली आहे, ती बातमी काय आहे पहा…..
पुणे : पतंगाचामांजा गळ्याला अडकल्याने दुचाकीवरून जात असतांना गळा चिरला जाऊन डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना आज (रविवारी) पुणे भोसरी मार्गावर नाशिक फाटा येथे घडली.असून मृत तरुणी चाळीसगाव येथील असल्याचं उघड झालं आहे घटनेची माहिती कळताच नातेवाईक पुण्याकडे रवाना झाली आहेत
या बाबत अधिक माहिती अशी कल्याण निकम, पौर्णिमा निकम यांची कन्या नामे डॉ. कृपाली निकम (वय 26, रा. पिंपळे सौदागर) मूळ राहणार चाळीसगाव या आज सायंकाळी पुण्याहून भोसरीकडे आपल्या अॅक्टिवा दुचाकीवरून येत होत्या. नाशिक फाटा येथील उड्डाणपुलावरून जात असताना त्यांच्या गळ्याला पतंगाचा मांजा अडकला. दुचाकीचा वेग जास्त असल्याने या मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला. त्याना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
कृपाली चाळीसगाव येथील असून डॉक्टर म्हणून पुण्यात आपली सेवा बजावत होती कृपालीची आई पौर्णिमा आणि वडील कल्याण निकम दोघे शिक्षक आहेत कृपालीच्या अपघाती निधन झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे .


















