सोलापूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी आमदार आडम मास्तर यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेमध्ये महापालिका इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर बोलताना सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी, एमआयएम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधात सेक्युलर अशा सर्व पक्षांनी एकत्र यावे असे विधान केले होते या विधानाचा एमआयएमचे शहर अध्यक्ष फारुक शाब्दी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे आडम मास्तर यांनी काय सेक्युलारिझमचा ठेका घेतला आहे का? त्यांना स्वतःचे डिपॉझिट दोन निवडणुकांमध्ये वाचता आले नाही अशांच्या तोंडून ही भाषा शोभत नाही अशा शब्दात यांच्यावर तोफ डागली पहा काय म्हणाले शाब्दी……

















