सोलापूर :- कॉंग्रेस पक्षातील ज्येष्ठ मंडळी आणि तरूण कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपण समन्वयाने काम करू अशी ग्वाही काँग्रेसचे नूतन जिल्हा अध्यक्ष डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल डाॅ.धवलसिंह मोहिते – पाटील यांचा दक्षिण सोलापूर विधानसभेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अकलूज येथील निवासस्थानी जाऊन लिंगायत समन्वय समितीच्या वतीने सोलापूर परिवहन समितीचे माजी सभापती विजयकुमार हत्तुरे आणि दक्षिण सोलापूरचे काँग्रेस नेते तथा जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते डाॅ.बसवराज बगले यांनी महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा देऊन,मानाचा फेटा बांधून डाॅ.धवलसिंह यांचा सत्कार केला.
मागासवर्गीय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिवशरण आणि युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रा.मनोज कुलकर्णी, जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शंकर सुरवसे यांनीही यावेळी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी डाॅ बसवराज बगले यांनी जिल्ह्यातील काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी आवश्यक त्या विषयावर चर्चा केली,आणि दक्षिण सोलापूरच्या राजकीय विषयांवर गुप्तगु केले…..!



















