जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पदभार घेतल्यापासून केवळ दोन ते अडीच महिन्यात जिल्हा परिषदेमध्ये विविध उपक्रम हाती घेतले आहेत त्यांच्या या उपक्रमांची कायम चर्चा असते त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर सदस्य आणि पदाधिकाऱ्यांमध्ये ही समाधानाचे वातावरण आहे दरम्यान “सरकारी काम आणि सहा महिने थांब” ही म्हणच शासकीय कार्यालयात प्रचलीत आहे आणि जिल्हा परिषद म्हटलं तर संपूर्ण ग्रामीण भागातून नागरिक आपले काम, निवेदन, तक्रारी घेऊन येतात सुमारे दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटरचा अंतर कापून अनेक जण आपल्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात येतात मात्र काम न झाल्यास त्यांना निराश आणि परतावे लागते एकूणच या सर्व गोष्टींचा विचार करून तसेच जिल्हा परिषदेला आलेल्या पत्रांचा निपटारा लवकरात लवकर होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी नवीन संकल्पना समोर आणली आहे ती म्हणजे झेड पत्र कार्य प्रणाली होय. ही कार्यप्रणाली येत्या 5 फेब्रुवारीपासून जिल्हा परिषदेमध्ये लागू करण्यात येणार आहे
झेड पत्र कार्य प्रणाली वर कशा पद्धतीने कामकाज चालणार आहे ते पाहूया……
झेड पत्र संदर्भाचा दर आठवड्याला विभागप्रमुखांनी स्वतः आढावा घ्यावा, विभागप्रमुखांच्या साप्ताहिक बैठकीत याविषयी मी स्वतः आढावा घेणार आहे ,मासिक समन्वय समितीच्या बैठकीतही या संदर्भाचा आढावा घेतला जाईल, या पत्र, स्मरणपत्र अर्धशासकीय पत्र किंवा फोन येणार नाही हे कृपया लक्षात घ्यावे , या पत्राचा निपटारा करण्यासाठी सर्वांनी सजग रहावे आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन सूचना द्याव्यात असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व विभागप्रमुखांना काढलेल्या पत्रात सूचना केल्या आहेत.जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामकाज प्रति सकारात्मकता निर्माण होणे व महत्त्वाच्या पत्रांचा जलद निपटारा होण्याकरिता या कार्यप्रणालीचा आरंभ करण्यात येणार आहे याकडे दुर्लक्ष व हयगय करू नये अन्यथा त्याची गांभीर्याने नोंद घेतली जाईल असा इशाराही मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व विभागप्रमुखांना दिला आहे .