सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये विविध महापुरुष यांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त प्रशासनाच्या वतीने अभिवादन केले जाते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रत्येक महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना वाटून दिली आहे. बुधवारी 20 ऑक्टोबर रामायणकार महर्षी वाल्मिकी यांची जयंती होती. जयंती साजरी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाची असल्याने त्या कार्यालयातील कार्यालयीन प्रमुख बसवेश्वर स्वामी यांच्यावर होती,
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सभागृहात गेले मात्र केवळ पाच ते सहा कर्मचारी उपस्थित होते, तेव्हा त्यांनी कमी उपस्थिती बाबत नाराजी व्यक्त केली. सर्वांना बोलवा दहा मिनिट थांबू असे सांगितले. दहा मिनिटानंतर पण पंधरा-वीस कर्मचारी सभागृहात येऊन बसले याच वेळी सूत्रसंचालन करत असलेले नागेश पाटील यांनी वाल्मिकी स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याची विनंती केली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत बसवेश्वर स्वामी, कास्ट्राईब संघटनेचे अरुण क्षीरसागर सामान्य प्रशासन विभागातील अनिल जगताप,समाज कल्याण मधील मघे यांनी अभिवादन केले.
याच वेळी मुख्य वित्त व लेखाधिकारी अजयसिंह पवार हे सभागृहात आले अभिवादनानंतर नागेश पाटील यांनी वाल्मिकी यांच्यावर दोन शब्द व्यक्त करण्याची विनंती उपस्थितांना केली मात्र कोणीही उठण्यास तयार होईना एकमेकांच्या तोंडाकडे सर्वजण बघू लागले सीईओ दिलीप स्वामी यांनी मी सर्वांना जबाबदारी वाटून दिली होती प्रत्येक विभागाने त्या-त्या पुरुषांबद्दल सांगावेत असे म्हणून समाज कल्याणच्या स्वामीवर नाराजी व्यक्त केली. अखेर अजयसिंह पवार व उमेद अभियानच्या जिल्हा व्यवस्थापक मीनाक्षी मडवळी यांनी पुढाकार घेऊन वाल्मिक यांच्यावर भाषण केले.
शेवटी भाषणाची कमान सीईओ दिलीप स्वामी यांनी सांभाळली व महर्षी वाल्मिकी यांच्या कार्याची विस्तृतपणे उपस्थित कर्मचाऱ्यांना माहिती दिली. जबाबदारी घेतल्यानंतर त्या विभागातील एका कर्मचाऱ्यांने भाषण करावे, त्यामुळे स्टेज डेरिंग वाढेल, त्या महापुरुषांचा अभ्यास होईल.

















