सोलापूर : गेली कित्येक दिवसांपासून ज्या मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रतिक्षा होती ती गुरुवार 16 सप्टेंबर रोजी अगदी सुरळीतपणे पार पडली. कोणाचीही काहीही तक्रार नाही, गोंधळ नाही, हसत खेळत ही प्रक्रिया पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन समुपदेशन पध्दतीने पार पडली. दिव्यांग, अस्थिव्यंग व इतर अशा 200 उपशिक्षकांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती करून समुपदेशन पध्दतीने पदस्थापना देण्यात आली.
यामध्ये एकुण 56 दिव्यांग शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला. मागील पंधरा वर्षांपासून दिव्याखाली रखडलेली प्रक्रिया प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थीत पार पडल्याबाबत शिक्षणाधिकारी राठोड यांनी प्रशासन विभागाचे आभार मानले.
सर्व शिक्षक संघटना व प्रशासन यांच्यामध्ये उत्तम समन्वय साधण्याचे काम शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी यशस्वी रित्या पार पाडल्याबद्दल सीईओ स्वामी यांनी शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड व त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत ही ऑनलाइन समुपदेशन प्रक्रिया सुरू होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, शिक्षण अधिकारी प्राथमिक संजयकुमार राठोड, उपशिक्षणाधिकारी जावीर हे मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित होते तर प्रत्येक तालूका पंचायत समितीच्या ठिकाणी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी पदोन्नती पात्र शिक्षकांसमवेत हजर होते.
मुख्याध्यापकाची प्रतिक्रिया पहा 👇👇👇👇
सर नमस्कार,
आज जिल्हास्तरीय मुख्याध्यापक प्रमोशन यशस्वीरित्या संपन्न झाले. माझ्या अकरा वर्षाच्या प्रशासकीय कारकीर्दीतील हे सर्वात यशस्वी मुख्याध्यापक प्रमोशन ठरले आहे.
या प्रक्रियेमधील काही महत्त्वाच्या बाबी म्हणजे –
▶️माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांचा सक्रिय सहभाग.
▶️ गट विकास अधिकारी यांचा सक्रीय सहभाग
▶️शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे वस्तुनिष्ठ व सकारात्मक नियोजन.
▶️ विषयाची अभ्यासपूर्वक व प्रभावी मांडणी.
▶️ प्रत्येकाच्या मताचा आदर व प्रत्येकाची घेतलेली दखल ही विशेष बाब.
▶️ सर्वांपर्यंत प्रशासन पोहोचवण्याचा मनापासूनचा प्रयत्न.
▶️ सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्यावर टाकलेला विश्वास
▶️ अडचणीच्या कालावधीमध्ये कर्मचारी व अधिकारी यांच्या पाठीमागे उभा राहून आधार देण्याचा नेहमीच केलेला यशस्वी प्रयत्न
वरील बाबी मला प्रकर्षाने जाणवल्या म्हणून आपल्या सर्व टीमचे शिक्षण विभाग पंचायत समिती कुर्डूवाडी यांच्या वतीने मनापासून अभिनंदन आणि मनापासून आभार




















