सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती समितीची बैठक गुरुवारी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत माळशिरस तालुक्यातील वेळापूर गटाचे सदस्य त्रिभुवन धाईंजे यांनी सोलापूर जिल्ह्यात अंगणवाडी पोषण आहारात झालेल्या घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला या प्रकरणात चौकशी समिती नेमून ही अहवाल बाहेर येत नाही त्यामुळे या प्रकरणात आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा देत जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख व कंत्राटदार प्रीतम शहा यांना जेलमध्ये घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी भूमिका मांडत या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कारभारावर संशय सदस्य धाईंजे यांनी व्यक्त केला. पहा काय म्हणाले ते……..