सोलापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती दक्षिण ,उत्तर सोलापूर या मधील आउटसोर्सिंग मध्ये काम करणाऱ्या 25 महिला व पुरुष स्वच्छता कर्मचारी त्याचप्रमाणे सुरक्षारक्षकांना महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियन च्या वतीने संपूर्ण फराळाचे साहित्य व सुगंधी वस्तूंचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशादिन शेळकंदे ,कार्यकारी अभियंता जलसंधारण पंडित भोसले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या प्रसंगी मान्यवरांनी या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, कुटुंबासोबत दिवाळी आनंदाने साजरा कराव्या अश्या प्रकारच्या शुभेच्छा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व संतोष धोत्रे यांनी दिल्या. याप्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज , डॉ.एस पी.माने,राकेश सोड्डी, राजीव गाडेकर, श्रीशेल देशमुख, धन्यकुमार राठोड ,अनिल जगताप ,संतोष शिंदे ,विशाल घोगरे ,शहाजहान तांबोळी, तजमुल मुतवली,दीपक माने, आप्पासाहेब भोसले आदी उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दयानंद परिचारक, त्रिमूर्ती राऊत ,श्रीधर कलशेट्टी, चेतन भोसले ,बसवराज जेऊरे, आदींनी परिश्रम घेतले.
















