सोलापूर:- सोलापूर जिल्ह्यात पालखी मार्गावर महिलासाठी शौचालय सुविधा ,सॅनिटरी नॅपकिन ची सुविघा तसेच हिरकणी कक्ष अशा विविध बाबींची प्रभावी अंमलबजावणी केलेबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. उत्कृष्ठ नियोजना बद्दल सिईओ दिलीप स्वामी यांचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सिईओ दिलीप स्वामी यांचे अभिनंदन केले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा सांभाळल्या पासून दिलीप स्वामी यांनी कोरोना काळात व नंतरही अनेक उपक्रम व संकल्पना राबविले आहेत. त्यांच्या कित्येक उपक्रमांचे राष्ट्रीय व राज्यस्तरावरून दखल घेऊन कौतुक झाले आहे. माझे मुल माझी जबाबदारी व स्वच्छ शाळा सुंदर शाळा हे उपक्रम राज्याला मार्गदर्शक ठरले आहेत.
आरोग्य वारी उपक्रमाचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या कौतुकामुळे सीईओ स्वामी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विशेष म्हणजे पालखी सोहळ्यादरम्यान रुपाली चाकणकर यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन आरोग्य वारी अंतर्गत सुरु असलेल्या उपक्रमांची पाहणी केली होती. या उपक्रमाचे त्याचवेळी त्यांनी तोंडभरून कौतुक करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले होते.
ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी देखील या उपक्रमाची दखल घेऊन सीईओ स्वामी यांचे विशेष संदेशाद्वारे अभिनंदन केले आहे.
या उपक्रमात ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, पाणी व स्वच्छता विभाग, उमेद या विभागांनी विशेष कामगिरी केली आहे.
*या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी वरील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सोलापूर जिल्ह्यात पालखी प्रवेश झाल्यापासून आजपर्यंत अथक परिश्रम केले आहेत.
हे सर्व श्रेय माझ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे- सिईओ दिलीप स्वामी
…………………
पालखी मार्गावरील गावात महिलांवर विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. पंढरपूर व माळशिरस तसेच इतर पालखी मार्गावर देखील हिरकणी कक्ष व सॅनिटरी पॅड ची व्यवस्था, महिला साठी स्वतंत्र शौचालय व्यवस्था करणेत आली होती. हे काम माझ्या अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे.त्यांचे हे कौतुक आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.