सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ सदस्य भारत आबा शिंदे हे आरोग्य अधिकाऱ्यांच्या कारभारावर नाराज दिसले. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आपली अब्रू जाईल असे वागू नये, त्यांनी कोरोना काळात आपल्या जिल्हा परिषदेने चांगले काम केले, मात्र केवळ आरोग्य अधिकाऱ्यांने केले नाही तर जिल्हा परिषदेची सर्व यंत्रणा राबली, डीएचओ विरोधात मी तेरा पानी तक्रारी अर्ज दिला होता, देशमुख नावाचा अधिकारी आला त्याने जिल्हा आरोग्य अधिकारी हा धुतल्या तांदळा सारखा असल्याच सांगत आपला रिपोर्ट दिला मग त्याला किती पैसे दिले, मंत्रालयातील लोक पैसे खातात तर जिल्हा परिषदेत पैसे खाणार्यांना वाईट म्हणायचे का?
एनएचएम च्या कर्मचाऱ्यांच्या पगारी दिल्या नाहीत, कोरोना काळात या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम केली, जिल्हा परिषदेने भरलेल्या बीएएमएस डॉक्टरांचा पगार नाही, खात्यात पैसे असताना ही केवळ टक्केवारी पाहिजे म्हणून पगार काढला जात नाही का?असा थेट आरोप केला. अशा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचे अभिनंदन का करायचे? त्यांच्या निषेधाचा ठराव करा.अशा शब्दात भारत आबा शिंदेंनी आपला संताप व्यक्त केला.

















