दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष पदाच्या तडकाफडकी बदलीनंतर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली होती, त्यानंतर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली त्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेतली,
यावेळी बोलताना मी जिल्ह्यातील दोन तालुक्यात राबवलेला नागरिकांचा जनता दरबार हा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आपल्या मतदारसंघात राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले, सुभाष पाटील बाबत पक्षाच्या वरिष्ठ बैठकीत ठोस निर्णय होईल असे सांगतानाच जिल्हाध्यक्षपदासाठी मी इच्छुक नाही व नव्हतो, यापुढे हे पद दिले तरी घेणार नाही पक्षाचे काम महत्त्वाचे आहे, पद नाही या शब्दात उमेश पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पहा ते काय म्हणाले


















