“एकूणच परिस्थिती लक्षात घेता सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सर्व सोलापूरकरांना कळकळीचे आवाहन आणि विनंती केली आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्या कारण अद्याप आठ लाख लोकांनी अजून पहिला लसीचा डोस घेतला नाही. ज्यांनी दोन्ही लसी घेतल्या आहेत ते बऱ्यापैकी सुरक्षित आहेत लसीकरणामुळे एक प्रकारचे सुरक्षाकवच आपणाला मिळेल”.
सोलापूर : दक्षिण आफ्रिकेत SARS-CoV-2 चा नवीन व्हेरिएंट ‘ओमिक्रॉन’ (Omicron) समोर आल्यानंतर अनेक देशात पुन्हा भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भारताची सुद्धा कोरोनाच्या या व्हेरिएंटबाबत चिंता वाढली आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून आलेले २ प्रवासी बंगळुरू विमानतळावर पॉझिटीव्ह सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. आतापर्यंत बंगळुरूमध्ये 594 प्रवाशी परदेशातून दाखल झाले आहेत. 94 प्रवाशी हे एका दक्षिण आफ्रिका देशातील आहेत. पॉझिटीव्ह आलेले दोन्ही रुग्ण विलिगीकरणात आहेत.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील टास्क फोर्सची तातडीची बैठक बोलावली आहे.
एकूणच परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आवाहन केले आहे की,
वैद्यकीय महाविद्यालयाने केलेल्या सिरो सर्वेलांस संशोधनातील निष्कर्षांच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांनी कोवीड लसीकरण घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
लसीकरण 100 टक्के झाल्यास खालील 3 फायदे होतील
1. कोवीड साथीचा प्रसार कमी होईल
2. रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी होईल
3. मृत्यू दर कमी येईल.
दुसऱ्या अर्थाने प्रशासनाला लॉकडाउन करण्याची गरज पडणार नाही.
लोकांची बेड साठी, ऑक्सिजन साठी, रेमेडीसिवीर साठी धावपळ होणार नाही.
कोणतेही निर्बंध नागरिकांवर लादण्याची गरज पडणार नाही.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील 18 वर्षापुढील लसीकरण उद्दिष्ट आणि सोलापुरात आजपर्यंत झालेले लसीकरण


















