सोलापूर : गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार मावळते जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून शनिवारी दुपारी बारा वाजता स्वीकारला. शनिवारी आणि रविवारी नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांबद्दल माहिती जाणून घेतली आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या माणुसकीचे अनेक उदाहरणे मागील साडेतीन वर्षांमध्ये सोलापूरकरांना पाहायला मिळाले आहेत. आता नव्याने आलेल्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याही माणुसकीचे दर्शन सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पाहायला मिळाले.
सध्या कुमार आशीर्वाद यांचे विविध स्तरातून स्वागत आणि सत्कार होत आहेत. त्यांच्या स्वागताला सोमवारी दुपारी दोन दिव्यांग बांधव आले. साहेब आत मीटिंग हॉलमध्ये बसले होते. शिपायाने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली व त्यांनी लगेच दोघांना आत बोलावले ते दोघे पायाने दिव्यांग होते. हे पाहून त्या दोघांना जिल्हाधिकारी कुमारी यांनी आपल्या शेजारी दोन खुर्च्यांवर बसवले आणि त्यांचा सत्कार स्वीकारला दिव्यांगाप्रती सन्मान पाहून त्या आलेल्या दोघांचे डोळे पानावल्याचे पाहायला मिळाले. हे चित्र तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये मात्र नक्की टिपले.