5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने नेहरूनगर पोल्ट्री फार्म येथे वड, पिंपळ, करंज, लिंब, जास्वंद सिताफळ 21वृक्षांचे रोपण कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे व सकाळचे निवासी संपादक अभय दिवाणजी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, डॉ. एस पी माने, जिल्हाध्यक्ष तजमुल मुतवली, डॉ.स्नेहांका बोधनकर डॉ. गिडे, महेश नारायणकर, श्रीशैल्य देशमुख, राजीव गाडेकर, राकेश सोडी, महेश पतंगे, रोहित घुले, विलास मसलकर, संतोष शिंदे, सचिन पवार, त्रिमूर्ती राऊत, सुनील चव्हाण, दीनानाथ जमादार आदि उपस्थित होते.
युनियनचे राकेश सोड्डी, प्रदीप सगट, शिवा खराडे, इराणा भरडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वृक्षारोपण करून त्याची जोपासना करण्याची जबाबदारी घेतली आहे..


















